वारसांना धनादेश वितरण.

वारसांना धनादेश वितरण.

03602
अपघाती मयत सभासदांच्या वारसांना धनादेश
मुरगूड : येथील श्री लक्ष्मी-नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे सावर्डे बुद्रुकमधील मयत सभासद शामराव बाबू सुर्यवंशी (रा. पिपळगांव बुद्रुक) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना विमा रकमेचा एक लाख रुपयांचा धनादेश वितरित केला. संस्थेने ३३०० सभासदांचा ओरिएन्टल विमा कंपनीकडे जीपीए विमा उतरविलेला होता. शामराव सूर्यवंशी यांचे वारस आक्काताई सूर्यवंशी यांना एक लाखाचा धनादेश वितरित केला. यावेळी सभापती अनंत फर्नांडिस, विनय पोतदार, पुंडलिक डाफळे, जवाहर शहा, चंद्रकांत माळवदे, किशोर पोतदार, दत्तात्रय तांबट, रवींद्र खराडे, दत्तात्रय कांबळे, रवींद्र सणगर, जगदीश देशपांडे, सुनीता शिंदे, भारती कामत, सुजाता सुतार यांच्यासह नवनाथ डवरी, मारुती सणगर, मनीषा डवरी, गजेंद्र भोसले, के. डी. पाटील, अनिल मगर, रामदास शिउडकर उपस्थित होते..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com