Sat, Sept 30, 2023

भैरवनाथ देवालय सुशोभीकरण शुभारंभ...
भैरवनाथ देवालय सुशोभीकरण शुभारंभ...
Published on : 29 April 2023, 5:24 am
03630
दौलतवाडीत देवालय सुशोभीकरण सुरू
मुरगूड : दौलतवाडी (ता. कागल) येथील भैरवनाथ देवालयाच्या पर्यटन विकासमधून मंजूर १ कोटींच्या सुशोभीकरण कामाचा प्रारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते व माजी सरपंच श्रीकांतराव भोसले, संदेश जाधव, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी येथील प्राथमिक शाळेला क्रीडांगण नसल्याने क्रीडांगणाची मागणी माजी सरपंच श्रीकांतराव भोसले यांनी ग्रामस्थांतर्फे केली. वीरेंद्रसिंह भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाजीराव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच शीतल जाधव, सुखदेव जाधव, गजानन जाधव उपस्थित होते.