
मेव्हण्या-पाव्हण्यांचा निर्णय लवकरच : आमदार मुश्रीफ
03657
मुरगूड : कुरुकली (ता.कागल ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रारंभप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ, संजय घाटगे व अन्य.
...
मेव्हण्या-पाव्हण्यांबाबतचा निर्णय लवकरच
मुश्रीफ ःके. पी.- ए. वाय. यांना कसे एकत्र बांधायचे हे चांगले माहिती
मुरगूड, ता.१४ : ‘माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या - पाव्हण्यांशी माझी चाळीस वर्षांपासूनची मैत्री असून त्यांनी कधीही आपल्या भावनांचा अनादर केलेला नाही. या दोघांनाही कसे एकत्र बांधायचे हे मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण स्वतः त्यांच्याबाबत निर्णय घेऊ,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
कुरुकली ( ता.कागल ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळपाणीपुरवठा योजना तसेच विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार मुश्रीफ बोलत होते. माजी आमदार संजय घाटगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, युवराज पाटील, धनाजी तोरस्कर आदी प्रमुख उपस्थित होते.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले,‘आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्याला मिळेलल्या संधीचा पुरेपूर वापर करत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे.’ यावेळी शशिकांत खोत, विकास पाटील यांची भाषणे झाली. याप्रसंगी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी ‘बिद्री’ चे संचालक प्रवीणसिंह भोसले, उमेश भोईटे, मनोज फराकटे, बी.जी.पाटील, नाना कांबळे, दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते. स्वागत सरपंच मीनाक्षी कुंभार यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच गिरीश पाटील यांनी केले. आभार सुरेखा पाटील यांनी मानले.
...
‘बिद्री’साठी इच्छुकांची भाऊगर्दी
‘बिद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी खासदार संजय मंडलिक हे देखील सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांचेही स्वागत आहे’, असे सांगताना आमदार मुश्रीफ यांनी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने ते कसे काय शक्य होईल? याबद्दल शंकाही व्यक्त केली.