ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात
ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात

ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात
मुरगूड : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या विरंगुळा केंद्रात संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी स्वागत केले. सचिव सखाराम सावर्डेकर यांनी मागील सभेचा वृतांत वाचून दाखवला. अध्यक्ष गजाननरान गंगापुरे यांनी कामकाजाची माहिती दिली. महादेव नागवेकर व निवृत्ती वंडकर यांचा संघास देणगी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सभेस खजानीस शिवाजी सातवेकर, पांडुरंग भाट, एम.टी.सामंत, रंगराव चौगले, महादेव वागवेकर, गणपती सिरसेकर, सिकंदर जमादार, अशोक डवरी, तुकाराम भारमल, रामचंद रनवरे, पांडुरंग चांदेकर, विष्णूपंत खैरे, बापूसो गुजर, विनायक हावळ, आशालता भोसले, सीमाताई गंगापुरे, विद्यागौरी हावळ, शकुंतला गंगापुरे उपस्थित होते. पी. आर. पाटील यांनी सूत्रसंचलन केले. रणजितसिंह सासने यांनी आभार मानले.