रखडलेला राज्यमार्ग : भाग ३. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडलेला राज्यमार्ग : भाग ३.
रखडलेला राज्यमार्ग : भाग ३.

रखडलेला राज्यमार्ग : भाग ३.

sakal_logo
By

03688

...
मुरगूड : निढोरी - मुरगूड मार्गावर पुराचे पाणी येणारा पूल असा अर्धवट अवस्थेत आहे.


रखडलेला निपाणी - फोंडा राज्यमार्ग : भाग ३ ... लोगो

....

महापुराचा धोका वाढण्याची शक्यता

निपाणी - फोंडा राज्यमार्गः रस्त्यावर येणारे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना नाहीच

प्रकाश तिराळे : सकाळ वृत्तसेवा
मुरगूड,ता.३० : निपाणी - फोंडा राज्यमार्गावर शिंदेवाडी, मुरगूड व निढोरी येथे वेदगंगा नदीला महापूर येतो. मुरगूडला तर बेटाचेच स्वरुप येते. अलिकडे याचे प्रमाण वाढलेले असताना रस्ता करताना ठेकेदार कंपनीने याचा फारसा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे यावर्षी रस्त्यावर महापुराचे पाणी आल्यानंतर वाहतूक ठप्प तर होणारच आहे. शिवाय मुरगूडजवळ महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
प्रतिवर्षी वेदगंगा नदीला महापूर येतो. मुरगूड शहरात येण्यासाठी मुदाळतिट्टा, निपाणी हे दोन महत्वाचे मार्ग आहेत. त्याशिवाय चिमगांव,दौलतवाडी, भडगांव,वाघापूर या मार्गांचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण जोरदार पाऊस लागल्यास वेदगंगेला पूर येताच कुरणी - भडगांव,वाघापूर - मुरगूड या दोन पुलावर पहिल्यांदा पाणी येते. पूर्ण पावसाळ्यात किमान चार ते पाचवेळा चार - सहा दिवसांसाठी वाहतूक ठप्प होते. सरपिराजीराव तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर सांडव्यावरील पाण्यामुळे दौलतवाडीमार्गे येणारी वाहतूकही ठप्प होते. मुरगूड स्मशानभूमीजवळील ओढ्यावर पाणी आल्याने येथेही मार्ग ठप्प होतो. शिंदेवाडीजवळ मसोबा मंदिराजवळील ओढ्यावर पाणी येते. त्यामुळे तोही मार्गही ठप्प होतो. परिणामी मुरगूडला बेटाचे स्वरुप येतो. ठेकेदार कंपनीने शिंदेवाडी येथील व मुरगूड येथील पूल या दोन पुलाचे रुंदीकरण करणे अपेक्षित असताना जैसे थे परिस्थिती ठेवल्यामुळे येथून पुराचे पाणी पास होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे पाण्याचा फुगवटा वाढणार आहे. हीच परिस्थिती शिंदेवाडीजवळ असल्याने याठिकाणीही गावात मोठ्याप्रमाणावर पाणी शिरणार आहे. यमगेपासून निढोरीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेली गटर अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचाही मोठा परिणाम होणार आहे. यमगे,शिंदेवाडी, माधवनगर पर्यंतचा मार्ग सध्या अर्धवट आहे.त्यामुळे या परिसरात येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे वाहतूक लगेच बंद करावी लागणार आहे.

....
पंधरा दिवसापूर्वीच्या पावसानेच दैना

पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने मुरगूडजवळ दैना करुन टाकली. जुनी दोन झाडे कोसळली. त्याबरोबर गटर बांधकामाच्या नियोजन शून्य कारभाराने शहराच्या प्रवेशद्वारापासून दोन बाजूला अक्षरशः गुडघाभर पाणी रस्त्यावर साचले होते.मग पावसाळ्यात काय आवस्था होईल हे सांगायलाच नको.
.........