पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

शेतातील वाटेवरून इस्पुर्लीत
दोन कुटुंबांत हाणामारी
--------------------
तिघे गंभीर जखमी; चौघांविरोधात गुन्हा
नंदगाव, ता. १० ः इस्पुर्ली (ता. करवीर) येथील दोन कुटुंबांत शेतातून जाण्यासाठी वाट दिली नाही, या कारणावरून मारामारी होऊन यात तुषार शंकर पोवार (वय २५), शंकर धोंडिराम पोवार (५५), सुवर्णा शंकर पोवार हे तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी जयसिंग बाबूराव पोवार, अमित दत्तात्रय पोवार, धनाजी दत्तात्रय पोवार, दत्तात्रय बाबूराव पोवार या चौघांविरुद्ध इस्पुर्ली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः दोन्ही कुटुंबांत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता व गावच्या तंटामुक्ती समितीत वादाचा तोडगा म्हणून जयसिंग पोवार यांनी शेतातून ये-जा करण्यासाठी शंकर पोवार यांना दोन गुंठे जमीन देण्याचे ठरले. परंतु, जयसिंग यांनी ती दिली नाही. म्हणून शंकर यांनी जयसिंग यांना शेतातून जाण्यास मनाई केली. जयसिंग राग मनात धरून होते. काल (ता. ९) सकाळी संकेत पोवार, शंकर पोवार व सुवर्णा पोवार हे तिघे त्यांच्या शेतात असताना जयसिंग यांच्या शेतात गेलेल्या सदू शेवाळे यांना कोठे गेला होता, असे विचारले. ‘जयसिंग यांच्या शेतात नांगरणीसाठी गेलो होतो’ असे सदू म्हणाला. का विचारतो? असे म्हणून शंकर पोवार यांना त्याने शिवीगाळ केली. घरातील लोकांना शेतात बोलावले व शंकर, संकेत व सुवर्णा पवार यांना हातात असलेला कोयता, खुरपे व काठीने मारहाण केली. तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ndo22a00055 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top