दर्याचे वडगाव मध्ये गॅस्ट्रो सदृश्य ची साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर्याचे वडगाव मध्ये गॅस्ट्रो सदृश्य ची साथ
दर्याचे वडगाव मध्ये गॅस्ट्रो सदृश्य ची साथ

दर्याचे वडगाव मध्ये गॅस्ट्रो सदृश्य ची साथ

sakal_logo
By

दऱ्याचे वडगाव येथे गॅस्ट्रोसदृश रुग्ण

आरोग्य विभागाकडून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा

दिंडनेर्लीः दऱ्याचे वडगाव (ता.करवीर) येथे गॅस्ट्रोसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दऱ्याचे वडगाव येथे गेले दोन दिवसांपासून गॅस्ट्रोसदृश साथीच्या आजाराची लक्षणे २० ते २५ ग्रामस्थांमध्ये दिसून येताच यातील सात जणांना कोल्हापुरातील दवाखान्यांत उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच इतर काही रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना घरीच प्राथमिक उपचार करत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकांकडून लोकांवर गावामध्येच
उपचार केले जात आहेत. ग्रामपंचायतीने दोन दिवस गावातील पाणीपुरवठा बंद करून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच रुग्ण आढळलेल्या गल्लीतील व इतरही ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन जैविक तपासणीसाठी पाठविले आहेत, पण यामध्ये गॅस्ट्रो नसल्याचे सांगण्यात आले. गावचा पाणीपुरवठा बंद असल्याने सरपंच अनिल मुळीक यांनी ‘गोकुळ’कडून पाण्याचे टँकर मागवून गावामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला.
गावामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, डॉ. संजय रणवीर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुक देसाई, साथरोग अधिकारी
डॉ. तौशिक, तसेच गटविकास अधिकारी विजय जाधव यांनी भेट देऊन सूचना दिल्या आहेत.
तसेच इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी साळवी, आरोग्य सहायक महादेव घोडके, रामदास मानतुटे व आरोग्य विभागाकडून लोकांमध्ये गॅस्ट्रोच्या लक्षणांबाबत माहिती देऊन पिण्याचे पाणी उकळून पिण्याचे अवाहन करण्यात आले आहे.