त्या आरोपींना 9 डिसेंबर पर्यंत पोलीस रिमांड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्या आरोपींना 9 डिसेंबर पर्यंत पोलीस रिमांड
त्या आरोपींना 9 डिसेंबर पर्यंत पोलीस रिमांड

त्या आरोपींना 9 डिसेंबर पर्यंत पोलीस रिमांड

sakal_logo
By

म्हाळुंगेतील वृद्धेच्या खूनप्रकरणी
पिता-पुत्राला पोलिस कोठडी

दागिने घेणारा सराफ रडारवर ः नवी दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा
नंदगाव, ता. ५ ः म्हाळुंगे (ता. करवीर) येथील लक्ष्मी एकनाथ पाटील ( वय ७५) या बेपत्ता वृद्धेचा दागिन्यासाठी गळा दाबून खून केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या बचाराम शंकर पाटील (वय ४५) व त्याचे वडील शंकर दत्तू पाटील (वय ७५, दोघेही रा. म्हाळुंगे) यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तिसरा संशयित अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारग्रहात रवानगी केली. दरम्यान, संशयितांनी दागिने कोणाला विकले, याचा पोलिस तपास करत आहेत. दागिने विकून नवी घेतलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लक्ष्मी पाटील ही वृध्दा २३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. इस्पुर्ली पोलिसांनी कसोशीने तपास करत हा खून उघडकीस आणला. पोलिस तपासात बचाराम शंकर पाटील व त्याचे वडील शंकर दत्तू पाटील या दोघांनी वृध्देचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. खून केल्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. रात्री उशिरा एका पांढऱ्या पोत्यात मृतदेह गुंडाळून तो दुचाकीवरून नेऊन निगवे खालसा ते शेळेवाडीच्या दरम्यान असलेल्या ओढ्यामध्ये टाकला. आरोपींनी चार लाख रुपयांचे दागिने विकून लोकांकडून घेतलेले हातउसने पैसे त्यांना परत दिले. तसेच एक दुचाकी खरेदी केली. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली, तर दागिने कोणाला विकले, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
...
चौकट

घरझडतीत तलवार जप्त

या गुन्ह्यामध्ये कोणत्याही हत्याराचा वापर केला नसल्याचे प्रथमदर्शी दिसत नसले तरी पोलिसांनी आरोपी बचाराम पाटील याच्या घराची झडती घेतली असता तेथे एक तलवार सापडली. ती पोलिसांनी जप्त केली.
..

इस्पुर्ली पोलिसांचे कौशल्य

लक्ष्मी पाटील ही वृध्दा २३ नोव्हेंबरपासून बेपत्ता असताना इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील व त्यांच्या पथकाने कसोशीने तपास केला. संपूर्ण गावातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. बारकाईने तपास करत अवघ्या दहा दिवसांत सत्य उघड केले आणि आरोपींना गजाआड केले.