सकाळी इफेक्ट:हंचणाळवाडी शाळेला मिळाले शिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळी इफेक्ट:हंचणाळवाडी शाळेला मिळाले शिक्षक
सकाळी इफेक्ट:हंचणाळवाडी शाळेला मिळाले शिक्षक

सकाळी इफेक्ट:हंचणाळवाडी शाळेला मिळाले शिक्षक

sakal_logo
By

हंचनाळवाडी शाळेत
अखेर शिक्षक रुजू
नंदगाव : नंदगावपैकी हंचनाळवाडी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नाही असा पवित्रा घेत संतप्त पालकांकडून शाळेला टाळे ठोकले होते. दरम्यान, गटशिक्षण व गटविस्तार अधिकाऱ्यांनी हंचनाळवाडी शाळेसाठी पालक व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार लेखी आदेश काढून पुढील आदेश येईपर्यंत अध्यापनासाठी १२ डिसेंबरपासून शिक्षकांची नियुक्ती करत असल्याचे पत्र दिले. संबंधित शिक्षक अध्यापनासाठी शाळेत हजर झाले आहेत. यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. दै. ‘सकाळ’ने याबाबत पाठपुरावा केला होता. याबाबत पालक संदीप बाळू हसणारे म्हणाले, ‘सहा महिन्यांपासून शिक्षकांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत होतो. परंतु दखल घेतली जात नव्हती. दै. ‘सकाळ’ने पाठपुरावा करून शाळेला शिक्षक मिळवून दिल्याबद्दल आम्ही ‘सकाळ’चे आभारी आहोत.
-
कोट
नियमित नियुक्तीने शिक्षक येईपर्यंत तात्पुरत्या कालावधीसाठी लेखी आदेश काढून हंचनाळवाडीतील शाळेसाठी शिक्षक दिले आहेत. शिक्षक बदली व नियुक्ती प्रक्रिया सुरू होताच शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येईल.
- समरजित पाटील, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती करवीर