कावणेतील युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
फोटो
....
विजेच्या धक्क्याने
कावणेतील युवकाचा मृत्यू
नंदगाव, ता.२३ः कावणे (ताः करवीर) येथे शिवदत्त मारुती पाटील (वय २७) या युवकाचा विजेचा शॉक लागून उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, शिवदत्त पाटील याचा निगवे खालसा रोडवर शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. सकाळी लवकर आई संपत्ती पाटील यांच्यासोबत जनावरांना चारा आणण्यासाठी तो गोठ्याशेजारीच असणाऱ्या शेतामध्ये गेला होता. थोडासा चारा घेवून गोठ्यामध्ये जनावरांच्यासाठी कुट्टी करत असताना त्याला शॉक लागला व तो जमिनीवर कोसळला. बराच वेळ झाला चारा आणण्यासाठी गेलेला मुलगा आला नाही म्हणून आई गोठ्यात गेली असता तिला शिवदत्त जमिनीवर पडलेला दिसला. हाका मारूनही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर आईने आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना बोलवले. जमलेल्या लोकांनी त्याला त्वरित उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालय येथे आणले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे आई ,वडिल व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.