
नेसरीत बसवेश्वर जयंती उत्साहात
01583
नेसरी : बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन प्रसंगी श्रीकांत गुंजाटी, रवींद्र हिडदुगी, आशिष साखरे, अशोक पांडव, रामचंद्र परीट, प्रकाश गुरव आदी.
नेसरीत बसवेश्वर जयंती उत्साहात
नेसरी : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच व ग्रामपंचायत नेसरीतर्फे महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वी जयंती उत्साहात झाली. सरपंच आशिषकुमार साखरे अध्यक्षस्थानी होते. श्रीकांत गुंजाटी, रवींद्र हिडदुगी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मंचाचे अध्यक्ष अशोक पांडव यांनी बसवेश्वर यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. हिडदुगी, प्रकाश गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. विनायक कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी उपसरपंच अमर हिडदुग्गी, नागोजी कांबळे, तुकाराम नवलगी, कार्तिक कोळेकर, अमर कोरे, वीरशैव समाजाचे संगाप्पा साखरे, शेखर सावळगी, विलास हल्लाळी, शेखर आरभावी, रवींद्र साखरे, अरविंद साखरे, कुमार भुसारी, सचिन भुसारी, किरण हिडदुगी, दयानंद गंगली, आनंदा कदम, शंकर पांडव, श्रावण कांबळे यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. रामचंद्र परीट यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01090 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..