
नेसरीचा गावतलाव जलपर्णीच्या विळख्यात
01634, 01635
नेसरी : पुरातन गावतलाव असा जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे. (छायाचित्र : दिनकर पाटील)
नेसरीचा तलाव जलपर्णीच्या विळख्यात
सुशोभीकरणाची गरज; पिकनिक पॉईंट विकसित करण्याची गरज
दिनकर पाटील : सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. २ : येथील ऐतिहासिक पुरातन गाव तलाव सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकला आहे. तलावातील गाळ काढून तलावासह परिसर सुशोभीकरण करून येथे पिकनिक पॉईंट विकसित करण्याची गरज आहे. नेसरीत नळ पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येण्यापूर्वी संपूर्ण गावाला पाणी देणाऱ्या या तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने गावाला एकेकाळी अनेक जीवनदान देणाऱ्या तलावाचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे.
या तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. नेसरीच्या पूर्व दिशेला तलाव असून तलावशेजारी शिव मंदिर, शूरवीरांची स्मृती जपण्यासाठी उभारलेले विरंगळ अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. जवळच नेसरीकरांचा ऐतिहासिक तटबंदीस्त जुना राजवाडा आहे. ग्रामपंचायत व श्रमदानातून अनेक वेळा तलावाची डागडुजी झाली आहे. मध्यंतरीच्या काळात तलावाचे दगडी पिचिंगसह गाळही काढण्याचे काम झाले होते. देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने जलपर्णी, गाळाने तलाव भरला आहे. तलाव वापरा विना अनेक वर्ष पडून आहे. लोकप्रतिनिधींनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यास तलावाचे सुशोभीकरण होण्यास मदत होईल व गावचे ऐतिहासिक अस्तित्व अबाधित राहील. यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेण्याची गरज आहे. नेसरीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निधीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. निधी उपलब्ध झाल्यास तलावाला गतवैभव व सौंदर्य प्राप्त होईल. सध्या तलावाचे चित्र अस्वच्छतेमुळे दयनीय झाले आहे. नेसरी गाव जवळपास २५ ते ३० खेड्यांचे केंद्र आहे. शैक्षणिक, सामाजिक प्रगतीत नेसरी अग्रेसर आहे. परंतु नेसरीसह परिसरात कोठेही चांगल्या दर्जाची उद्यान व्यवस्था नाही. तलाव परिसर सुशोभीकरण करून उद्यानाची निर्मिती झाल्यास ग्रामस्थांची चांगली सोय होण्यास मदत होईल. पिकनिक पॉईंट विकसित करून मुलांसाठी बोटिंग सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नाचे साधन निर्मिती होईल व तलाव परिसराचे रूपडे पालटेल यात शंका नाही.
------------
दृष्टिक्षेप
- तलावाचे अस्तित्व सध्या धोक्यात
- देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था
- जलपर्णी, गाळाने तलाव भरला आहे
- तलाव अनेक वर्षे वापरा विना
- लोकप्रतिनिधींकडून भरघोस निधी उपलब्ध होण्याची गरज
- तलावाचे सुशोभीकरण करण्याची गरज
Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01114 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..