नेसरी पेठत स्वच्छतागृहाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरी पेठत स्वच्छतागृहाची गरज
नेसरी पेठत स्वच्छतागृहाची गरज

नेसरी पेठत स्वच्छतागृहाची गरज

sakal_logo
By

नेसरी पेठेत स्वच्छतागृहाची गरज
बाजाराच्या दिवशी कुचंबणा अधिक; अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित
दिनकर पाटील : सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. १५ : गडहिंग्लज उपविभागातील मध्यवर्ती बाजार पेठेचे केंद्र अशी नेसरीची ओळख आहे. मात्र, बाजारपेठेमध्ये सोयीनीयुक्त सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने आठवडा बाजारदिवशी विशेषकरून महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. बाजारपेठेत स्वच्छतागृहाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
दर गुरुवारी नेसरीचा आठवडा बाजार भरतो. जवळपास ३० ते ४० खेड्यांतील नागरिक, महिला वर्ग बाजारासाठी, तर गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील, बेळगाव, संकेश्‍वर परिसरातून व्यापारी भाजीपाला, फळे, कपडे आदी माल विक्रीसाठी येथे येतात. मुख्य बाजारपेठेसह गणेश गल्ली, बसवेश्‍वर गल्ली, नांदवडेकर गल्ली, नेसरी-कानडेवाडी रस्ता या ठिकाणी बाजार भरतो. बसस्थानक परिसर सोडल्यास कोठेच सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. व्यापारासाठी आलेल्या महिला, नागरिक सकाळी आठपासून ते सायंकाळी सहापर्यंत बसतात. पावसाळ्यात अधिक त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी होणारी कुचंबणा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष देऊन सोयीच्या ठिकाणी सोयीनीयुक्त स्वच्छतागृह उभारून महिला, नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.
-------------
कोट
नेसरी बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून स्वच्छतागृहाचा प्रश्‍न सुटलेला नाही. महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने गांभीर्याने विचार करून सोयीनीयुक्त स्वच्छतागृह उभारण्याची गरज आहे.
- संजय जानबा नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य
--------------
नेसरीमध्ये दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. हजारो महिला, नागरिक खरेदी विक्रीसाठी येतात. बाजारपेठेत कोठेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने विशेष करून महिला व्यापारी वर्गाची कुचंबणा होत आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष देऊन सोयीनयुक्त स्वच्छतागृह बांधण्याची गरज आहे.
- रिजवाना बागवान, व्यापारी नेसरी

Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01155 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top