भावेश्‍वरी विद्यालय, न्यु इंग्लिशमध्ये कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावेश्‍वरी विद्यालय, न्यु इंग्लिशमध्ये कार्यक्रम
भावेश्‍वरी विद्यालय, न्यु इंग्लिशमध्ये कार्यक्रम

भावेश्‍वरी विद्यालय, न्यु इंग्लिशमध्ये कार्यक्रम

sakal_logo
By

01748
हेब्बाळ-जळद्याल : न्यू इंग्लिश स्कूल आणि श्री भावेश्‍वरी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणप्रसंगी पालक व शिक्षक वर्ग.


भावेश्‍वरी विद्यालय,
न्यू इंग्लिशमध्ये कार्यक्रम
नेसरी, ता. २५ : हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूल व श्री भावेश्‍वरी ज्युनिअर कॉलेजमध्ये पालक मेळावा व वृक्षारोपण, असा संयुक्त कार्यक्रम झाला. ग्रामविकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष दावणे अध्यक्षस्थानी होते. या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक आणि शिक्षकांत चर्चा झाली. पालक बसवाणी कांबळे, मारुती गावडे, भरमू अंबुलकर, संजय करंबळकर, दीपक गुरव, दीपक दळवी, जयवंत करंबळकर, निंगाप्पा भांदुर्गे, विठ्ठल पाटील, आनंदा गुरव, सुभाष सासुलकर, अनिल सुतार, मारुती नाईक, रेश्मा गावडे, सुमन रेडेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्याध्यापक एम. एस. देशमुख यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पी. एच. वाळवे यांनी स्वागत केले. शिक्षक के. एम. गस्ती, एस. व्ही. नाईक, व्ही. ए. दावणे, एस. डी. बामणे यांनी पालकांशी संवाद साधला. या वेळी पालकांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. संस्थेचे सचिव जानबा यमगेकर, पालक उपस्थित होते. एस. एस. कुंभार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01170 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..