हेब्बाळ-जळद्याल बातमी व फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेब्बाळ-जळद्याल बातमी व फोटो
हेब्बाळ-जळद्याल बातमी व फोटो

हेब्बाळ-जळद्याल बातमी व फोटो

sakal_logo
By

01954
हेब्बाळ-जलद्याळ : रौप्यमहोत्सवी स्नेहमेळाव्याप्रसंगी गुरूवर्य व माजी विद्यार्थी.

हेब्बाळ-जलद्याळला
रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा
नेसरी, ता. २ : हेब्बाळ-जळद्याल (ता. गडहिंग्लज) येथे न्यू इंग्लिश स्कूल शाळेत १९९६-९७ च्या बॅचचा रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा झाला. ‘अशी पाखरे येती अनेक स्मृती ठेवूनी जाती... पंक्तीप्रमाणे उत्साहात झाला. माजी मुख्याध्यापक व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी. जी. काटे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जीएसटी आयुक्त ए. व्ही. रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ए. व्ही. कोरे, एम. ए. पाटील, एम. बी. दावणे, बी. आर. कुलकर्णी, के. एल. पाटील, श्रीमती एस. जे. नलवडे पी. बी. करंबळकर, बी. डी. कांबळे, डी. आर. नाईक या गुरूवर्यांचा सत्कार झाला. सद्यःस्थितीत आपल्या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदस्थ असल्याने समाधान वाटत असल्याचे एम. ए. पाटील यांनी सांगितले. श्री. रेडेकर म्हणाले, शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगत शाळेची पन्नास वर्षांची वाटचाल सांगितली. विद्यार्थ्यांनी
पंचवीस वर्षीपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. संयोजक संतोष गुरव, बाळगोंड पाटील, किरण यमगेकर, वृषाली यमगेकर, शीतल दावणे यांनी केले. श्री.आंबूलकर यांनी सूत्रसंचालन, शशिकांत बामणे यांनी आभार मानले.