नेसरी माजी सरपंचांचा आत्मदहनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरी माजी सरपंचांचा आत्मदहनाचा इशारा
नेसरी माजी सरपंचांचा आत्मदहनाचा इशारा

नेसरी माजी सरपंचांचा आत्मदहनाचा इशारा

sakal_logo
By

नेसरी माजी सरपंचांचा
आत्मदहनाचा इशारा
नेसरी : येथील ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत तीन वर्षांपासून झटत असून चौकशीच्या नावाखाली ग्रामपंचायत मुदत संपत आली तरी कारवाई झालेली नाही. याच्या विरोधात माजी सरपंच प्रकाश सखाराम दळवी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात मंगळवारी (ता. १५) बसस्थानक परिसरात रास्ता रोको, आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. २० नोव्हेंबरला ग्रामपंचायत मुद्दत संपते त्या मुदतीच्या आत कार्यवाही करणार असाल तर कळवावे अन्यथा मंगळवारी (ता. १५) बसस्थानक परिसरात रास्ता रोको व मी आत्मदहन करण्याचा इशारा देत असल्याचे म्हटले आहे. माहितीसाठी निवेदन जिल्हाधिकारी, गडहिंग्लज तहसिलदार आणि नेसरी पोलिस ठाण्यास दिले आहे.