नेसरी हायस्कूलमध्ये बालदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरी हायस्कूलमध्ये बालदिन
नेसरी हायस्कूलमध्ये बालदिन

नेसरी हायस्कूलमध्ये बालदिन

sakal_logo
By

नेसरी हायस्कूलमध्ये बालदिन
नेसरी : पंडित जवाहरलाल नेहरूंचे देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन प्रा. संजय पाटील यांनी केले. येथील एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये बालदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य अमृत लोहार अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य लोहार, उपप्राचार्य आय. टी. नाईक, शालेय मंत्रिमंडळ सदस्य यांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन झाले. उपप्राचार्य नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक एस. जे. कालकुंद्रीकर, पर्यवेक्षक एस. एच. पाटील, प्रा. एल. एम. धुळाणावर, प्रा. ए. बी. बागडी आदी उपस्थित होते. प्रा. एम. ए. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अस्मिता निंबाळकर यांनी आभार मानले.