Thur, June 1, 2023

नेसरी प्रशासकीय सेवक आंदोलन बातमी व फोटो
नेसरी प्रशासकीय सेवक आंदोलन बातमी व फोटो
Published on : 21 February 2023, 2:08 am
02086
नेसरी प्रशासकीय सेवक
आंदोलनास ‘फास्टा’चा पाठिंबा
नेसरी, ता. २० : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामधील प्रशासकीय सेवक डाॅ. अर्चना कोलेकर, मोहन शिंदे, रवींद्र हिडदुगी, शशिकांत सलामवाडे, संतोष पाटील, अशोक पांडव, दिनकर पाटील, विठ्ठल आजगेकर सहभागी झाले होते. यावेळी फास्टा संघटनेचे संघटक डाॅ. विकास क्षीरसागर, डाॅ. एच. एस. कुचेकर, डाॅ. जे. के. ससाणे, डाॅ. डी. के. कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासकीय सेवक आंदोलनास पाठींबा दिला.