
अर्जुनवाडी बातमी व फोटो
02091
अर्जुनवाडी : हत्तीकडून झालेले ऊस पिकाचे नुकसान
...
अर्जुनवाडीत हत्तीकडून ऊस पिकाचे नुकसान
नेसरी : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी शिवाजी मारुती पाटील यांच्या ‘मानी’ नावाच्या शेतातील ऊस पिकाचे हत्तीकडून मोठे नुकसान झाले. हत्तीने सुमारे एक एकरातील उसाची नासधूस केली. घनदाट जंगल भागात हत्तीचे वास्तव्य असून रात्रीच्या वेळी हत्तीकडून पिकांचे नुकसान होत आहे. अनेक वर्षांपासून गव्यांच्या कळपांकडून त्रस्त असलेले शेतकरी आता हत्तीचा उपद्रव वाढल्याने मेटाकुटीस आले आहेत. वन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
...
बांबवडे-कोकरूड एसटी फेऱ्यांमध्ये वाढ
सरुड ः शाहूवाडी तालुक्यातील पूर्व भागातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मलकापूर आगाराने बांबवडे-कोकरूड या मार्गावर एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून सायंकाळी चारला जादा गाडी सुरू करावी, अशी मागणी ‘सकाळ’ यिनच्या वतीने व ठाकरे गटाने एका निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेऊन मलकापूर आगाराने जादाची फेरी सुरू केल्याने विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बांबवडे ते कोकरूड मार्गादरम्यान येणाऱ्या बांबवडे, वाडीचरण, सरुड, वडगाव, वारणा कापशी, शिवारे, माणगाव, हारुगडेवाडी, भेडसगाव, नेर्ले, कोकरूड आदी गावांतील विद्यार्थी कापशी, सरुड, बांबवडे, भेडसगाव, कोकरूड येथील माध्यमिक शाळेत तसेच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या वेळेस या मार्गावरील एसटी सेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत एसटीची प्रतीक्षा करावी लागत होती. दरम्यान, ही एसटी सेवा सुरू केल्याबद्दल मलकापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, सरूड शाखाप्रमुख बळवंत सोमोशी-पाटील, विभागप्रमुख गणेश पाटील, ‘यिन’चे सिद्धेश तडवळेकर, दिग्विजय तडवळेकर, स्वप्नील तडवळेकर आदी उपस्थित होते.
...
...
2479
वारणानगर : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावताना कोडोली डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर्स.
...
कोडोली मेडिकल असोसिएशनतर्फे
ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर
कोडोली : येथील कोडोली मेडिकल असोसिएशनच्या वतीने अपघात नियंत्रण उपक्रमांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावण्यात आले. वारणा सहकारी साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यात हा कार्यक्रम पार पडला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी लहान-मोठे अपघात घडतात. अपघात टळावेत, या हेतूने हे रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी डॉ. नागनाथ डोईजड, डॉ. जयवंत पाटील, डॉ. बसवराज हंचनाळे, डॉ. सुनील कोळेकर, डॉ. अभिजित शिराळकर, डॉ. दीपक काटे, संजय दळवी, शिवाजी पाटील यांच्यासह कोडोली डॉक्टर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
...