
अर्जुनवाडी बातमी व फोटो वृद्धा मृत्यू
2108
...
अर्जुनवाडीत पालापाचोळा
पेटवताना वृद्धाचा मृत्यू
नेसरी, ता. ४ : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रामजी गणू जाधव (वय ८०) या वृद्धाचा काजू बागेतील पालापाचोळा पेटवत असताना आगीत मृत्यू झाला. जाधव हे नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास आपल्या ‘माळाचे शेत’ नावाच्या शेतातील काजूच्या बागेत गेले होते. दरम्यान, ते काजू बागेतील साफ-सफाई करुन पालापाचोळा पेटवत असताना सकाळी दहा ते पावणे बाराच्या सुमारास बागेमध्ये आग विझवताना आगीमध्ये सापडले. यामध्ये त्यांचा गुदमरुन, भाजून मृत्यू झाला. ही बातमी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांच्या मागे मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. याबाबतची वर्दी शंकर विष्णु पाटील (रा. अर्जुनवाडी) यांनी नेसरी पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल के. एस. तडवी करीत आहेत.