नेसरीत फसवणूक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरीत फसवणूक बातमी
नेसरीत फसवणूक बातमी

नेसरीत फसवणूक बातमी

sakal_logo
By

चोरी झाल्याची बतावणी
करून वृद्धेची फसवणूक

नेसरीतील घटना : पाच तोळे सोन्याचे दागिने पळविले

नेसरी, ता. ५ : ‘काल येथे चोरी झाली आहे, येथून दागिने घालून कोणी जायचे नाही, असा आम्हाला वरून आदेश झाला आहे,’ अशी बतावणी करून वृद्धेचे पाच तोळे सोन्याचे दागिने दोघा अज्ञातांनी पळविले. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेने नेसरी परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद श्रीमती शांता श्रीकांत कोरे (वय ७८) यांनी नेसरी पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना रविवारी (ता. ५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोहर खानावळीच्या बाजूने जाणाऱ्या रोडवर संकल्प हॉस्पिटलजवळ घडली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी कोरे रस्त्यावरून एकट्याच आपल्या घरी जात होत्या. दरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने त्यांना काल येथे चोरी झाली आहे, येथून दागिने घालून कोणी जायचे नाही, असा आम्हाला वरून आदेश झाला आहे, असे सांगितले. त्यांनी कोरे यांच्या गळ्यातील सर व हातातील सोन्याच्या पाटल्या काढण्यास सांगून त्या एका पुडीत गुंडाळल्या. पाटल्या गुंडाळलेली पुडी त्यांनी आपल्याकडे ठेवली. थोड्या वेळाने त्यांनी कोरे यांना दुसरीच कागदाची पुडी देऊन फसवणूक केली. यामध्ये कोरे यांची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाली. दोघा अज्ञातांपैकी एकाच्या अंगात निळसर रंगाचा फूल शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट होती. तो मराठी भाषा बोलणारा होता. तर दुसऱ्याच्या अंगात राखाडी फूलशर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट होती. नेसरी पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल के. एस. तडवी करत आहेत.