नेसरी व्याख्यान बातमी व फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरी व्याख्यान बातमी व फोटो
नेसरी व्याख्यान बातमी व फोटो

नेसरी व्याख्यान बातमी व फोटो

sakal_logo
By

02135
नवीन शैक्षणिक धोरण
लाभदायी : डॉ. भांबर
नेसरी कोलेकर महाविद्यालयात एकदिवसीय चर्चासत्र
नेसरी, ता. १३ : नवीन शैक्षणिक धोरण भावी पिढीसाठी लाभदायक असून कौशल्य विकासबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. एस. बी. भांबर यांनी केले. येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्रे मंडळ आयोजित ‘सामाजिक शास्त्रांचे नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्व’ विषयावर चर्चासत्रात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. दोन सत्रांत चर्चासत्र झाले. पहिल्या सत्रात डाॅ. एम. एस. कोळसेकर तर दुसच्या सत्रात डाॅ. डी. एम. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील सामाजिक शास्त्रांचे महत्त्व विशद करून गुण-दोष स्पष्ट केले. समन्वयक डाॅ. विकास क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डाॅ. विजय मुसाई होते. डाॅ. माधव भोसले, प्रा. संगीता लोखंडे, डाॅ. डी. के. कांबळे, प्रा. विनया कांबळे, प्रा. वसंत कांबळे, प्रा. वाय. पी. पाटील उपस्थित होते. प्रा. विजया पाटील यांनी सूत्रसंचालन, प्रा. अजयकुमार देसाई, डाॅ. एच. एस. कुचेकर यांनी आभार मानले.