महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

sakal_logo
By

महात्मा फुले हायस्कूलच्या
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
नेसरी, ता. ११ : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा फुले हायस्कूलच्या १९९९ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येत जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक विजय गुरबे अध्यक्षस्थानी होते.
माजी मुख्याध्यापक आर. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संदीप गोरुले यांनी शाळेला भरीव आर्थिक मदत केली. माजी विद्यार्थ्यांनी शाळा विकास फंडास आर्थिक मदत केली. माजी विद्यार्थी नामदेव गव्हाळे, शोभा तोडकर, संदीप सावंत, दत्ता राजाराम, संतोष लोहार, संदीप पाटील, तुळसा कांबळे, परशराम मांगले, वासंती सुतार, शिक्षकांमधून आर. के. पाटील, विजय गुरबे, डी. ए. वाईंगडे, के. आर. माने यांनी मनोगत व्यक्त केले. मारूती दुंडगेकर, प्राचार्य अमृत लोहार, सागर नांदवडेकर, तुकाराम कांबळे, सदाशिव नाईक, तुकाराम कुंभार, एस. एन. सावंत, दत्तात्रय मलगेकर यांच्यासह १९९९ मधील चार तुकडीतील तुकडीतील १२० विद्यार्थी उपस्थित होते. नारायण बोर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाग्यश्री देसाई, सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मोहन मटकर यांनी आभार मानले.