
वाघराळीत निवृत्तीनिमित्त नामदेव प्रधान यांचा सत्कार
वाघराळीत निवृत्तीनिमित्त नामदेव प्रधान यांचा सत्कार
नेसरी, ता. ८ : वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील सीआरपीएफमधून निरीक्षक पदावरून ३८ वर्ष सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल नामदेव बाबू प्रधान यांची मिरवणूक काढून सत्कार केला.
गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सायंकाळी गावकऱ्यांसह आजी-माजी सैनिक संघटना पदाधिकारी यांनी प्रधान यांची उघड्या जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत प्रमुख गल्लीतून मिरवणूक काढली. जागोजागी प्रधान यांचे महिलांनी औक्षण केले. गडहिंग्लज तालुका आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष कुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रकाश भुईंबर, आप्पा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रधान यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अनेक अनुभव कथन केले. आजी- माजी सैनिक संघटना अध्यक्ष वसंत गवेकर, संभाजी पाटील, राजाराम पाटील, संतु सावंत, शिवाजी पसारे, विलास मटकर आदी उपस्थित होते. सागर रेडेकर यांनी प्रास्ताविक केले. महादेव साळवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भुईंबर यांनी आभार मानले.