शियेत खंडोबा मंदिराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शियेत खंडोबा मंदिराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
शियेत खंडोबा मंदिराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

शियेत खंडोबा मंदिराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

sakal_logo
By

शियेत खंडोबा मंदिराच्या
नूतन वास्तूचे उद्‍घाटन

शिये, ता. ३ : वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या दत्ता शिंदे यांनी स्वखर्चातून बांधलेले खंडोबा मंदिर लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी आहे, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. शिये (ता.करवीर) येथील खंडोबा मंदिराच्या नूतन वास्तूच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच रेखा जाधव अध्यक्षस्थानी होत्या. शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, निवडणुकीच्या काळात मतदारांना अनेक आश्वासने दिली जातात. पण त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा होत नाही. दत्ता शिंदे यांच्यासारखा ग्रामपंचायत सदस्य वडील सर्जेराव शिंदे यांच्या सामाजिक कार्यापासून प्रेरणा घेऊन निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी रामोशी समाजाचे कुलदैवत श्री खंडोबाचे मंदिर स्वखर्चाने बांधून देतो, हे कौतुकास्पद आहे. शिये व जठारवाडी येथील पाणंद रस्त्यासाठी वाढीव १५ लाख रुपये निधी तत्काळ मंजूर करणार असल्याचे सांगून सर्व्हे नंबर १८७ मधील बेघर वसाहत येथील नागरिकांचे अतिक्रमण कायम करण्याबाबत सोमवारी ( ता. ९ ) विशेष बैठक घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, पांडुरंग पाटील, उपसरपंच प्रभाकर काशीद, जयसिंग काशीद, विकास चौगले, हनमंत पाटील, माधुरी शिंदे, शीतल मगदूम, अशोक शिंदे, तानाजी शिंदे, रमेश शिंदे, जालिंदर शिंदे, आदी उपस्थित होते. आसिफ पठाण यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव कोळी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01890 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top