पुलाची शिरोलीत परस्पर विरोधी फिर्यादीवरून सव्वीस जनांविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलाची शिरोलीत परस्पर विरोधी फिर्यादीवरून सव्वीस जनांविरुद्ध गुन्हा
पुलाची शिरोलीत परस्पर विरोधी फिर्यादीवरून सव्वीस जनांविरुद्ध गुन्हा

पुलाची शिरोलीत परस्पर विरोधी फिर्यादीवरून सव्वीस जनांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By

मारामारी प्रकरणी
२६ जणांवर गुन्हा
शिरोली पुलाची येथील कार्यक्रमात राडा
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. ११ : पुलाची शिरोली येथील मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शिरोली यात्रेनिमित्त आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमात रविवारी (ता. ८) रात्री मारामारी झाली होती. याबाबत एका गटाने दगडफेक केल्याने दुसऱ्या गटातील तरुणांनी वार करत एकाला गंभीर जखमी केले. अन्य दोघे जखमी झाले होते. पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील तरुणांशी चर्चा करून माहिती घेतली. अखेर दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारी घेऊन गुन्हा दाखल केला.
सतीश पांडुरंग पाटील यांच्या तक्रारीवरून ऋत्विक पवार, गणेश भुसारे, ऋषिकेश पवार, गणेश शिंदे, विवेक शिंदे, नीलेश शिंदे, विनायक शिंदे, अतुल शिंदे, दीपक पवार, राकेश शिंदे, हेमंत शिंदे व मनोज गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.
बजरंग दत्तू पवार यांच्या फिर्यादीवरून कपिल सावंत, अमोल चौगुले, योगेश खाडे, स्वप्नील खोचेकर, कुलदीप चौगुले, मयूर चौगुले, सागर खोचेकर, गणेश खोचेकर, नीलेश चौगुले, अर्जुन चौगुले, सतीश पाटील, प्रथमेश खाडे व उमेश डांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तरुणांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यात अनेकजण पसार झाले आहेत. सतीश पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केलेल्या तरुणांपैकी आठ जणांना पेठवडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी दिली.
बजरंग पवार यांच्या तक्रारीवरून अटक केलेल्या पाच जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील हे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01897 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top