पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

अटक केलेले ५८ मजूर १८ वर्षाखालील
----------------
बाल कामगार प्रकरण; ४८ प्रौढ मजुरांना सोडले

नागाव, ता. १३ : प्रियदर्शनी पॉलिसॅक कंपनीतील सुटका केलेल्या १२३ मजुरांपैकी ५८ मजूर १८ वर्षांखालील आहेत. ४८ मजूर हे प्रौढ असल्याने त्यांना सोडून दिले. तर १७ नावे दुबार झाली आहेत. १८ वर्षाखालील ५८ पैकी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन व पंधरा वर्षे वयापेक्षा कमी बालमजूर अशी आणखी एक छाननी सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष छाननी समिती काम करत आहे. सहायक कामगार आयुक्त समितीचे सदस्य आहेत.
समितीचा अहवाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील प्रियदर्शनी पॉलिसॅक या कंपनीवर बाल कामगार विरोधी पथकाने काल धाड टाकली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. या कारवाईत प्रथमदर्शी १२३ बालमजुरांची सुटका केली.
हे सर्व मजूर पश्चिम बंगाल व मिझोरम या प्रांतातील आहेत. ‘अवनि’ संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांच्या म्हणण्यानुसार कंपनी प्रशासनाने बनावट आधार कार्ड बनवून काही बांगलादेशी मजुरांना ठेकेदारातर्फे कामावर घेतले आहे. शिवाय मासिक सात हजार पगारावर १२ तास काम करवून कंपनीने किमान वेतनाच्या कायद्याचीही पायमल्ली केली आहे. कामगारांना राहण्यासाठी अस्वच्छ अशी जागा निवडली आहे. अनेक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या या कंपनीची चौकशी करून संबंधित कंपनीवर गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01901 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top