शेत जमिनीच्या वादातून मौजे वडगावत सख्ख्या भावांनी एकमेकांवर केला वीळ्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेत जमिनीच्या वादातून मौजे वडगावत सख्ख्या भावांनी एकमेकांवर केला वीळ्याने वार
शेत जमिनीच्या वादातून मौजे वडगावत सख्ख्या भावांनी एकमेकांवर केला वीळ्याने वार

शेत जमिनीच्या वादातून मौजे वडगावत सख्ख्या भावांनी एकमेकांवर केला वीळ्याने वार

sakal_logo
By

जमिनीच्या वादातून
सख्खे भाऊ भिडले
मौजे वडगावात घटना; एकमेकांवर विळ्याने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. १६ : शेतजमिनीच्या वादातून मौजे वडगाव येथील सख्ख्या भावांनी एकमेकांवर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. वैभव पाटील व वृषभ पाटील अशी जखमींची नावे आहेत. दोघांच्याही फिर्यादी घेऊन परस्परविरोधी गुन्हा दाखल करून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : वैभव व वृषभ यांच्या शेतजमिनीच्या वाटण्या वडील हयात असतानाच झाल्या होत्या. त्यामुळे वडिलांचा शेतजमिनीचा हिस्सा शिल्लक होता. वडिलांच्या मृत्यूनंतर संबंधित शेतजमिनीवर दोघाही भावांनी अधिकार सांगितला. यातूनच आज दुपारी दीडच्या सुमारास वैभवने वृषभच्या हातावर विळ्याने वार केला. वृषभनेही वैभवच्या मांडीवर विळ्याने वार केला. दोघांनाही पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र रक्तस्राव बघता प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात पाठविले. तेथेच दोघांचे जबाब घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले. रात्री उशिरा हे प्रकरण शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे आले. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

वडिलांच्या हिश्‍श्‍यावरून वाद
वैभव व वृषभ यांना आणखी एक भाऊ होता. विजेच्या धक्क्याने काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्या अगोदर वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीचे समान हिस्से करून माझा हिस्सा दे अशी वृषभची वैभवकडे मागणी होती.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01903 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top