
पुलाची शिरोलीत चोरट्यांचा धुमाकूळ
पुलाची शिरोलीत
चोरट्यांचा धुमाकूळ
चार घरफोड्या; ऐवज न मिळाल्याने साहित्य विस्कटले
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. ३ : पुलाची शिरोली येथील हौसिंग सोसायटीत काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांकडून रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या. मात्र हाताला काही लागले नसल्यामुळे चोरट्यांनी साहित्य विस्कटून टाकले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : भीमराव लबडे यांच्या घरात दोघे भाड्याने राहतात. दोघेही शिरोली औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत. यातील राजेंद्र पायगल कौटुंबिक कार्यक्रमासाठी अमरावतीला गेले आहेत. अगतराव जावीर यांचे घरातील सर्वजण बाहेरगावी गेले आहेत. शिवाय लबडे स्वतः घराला कुलूप लावून कामावर गेले होते. दोन्ही घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. काही न मिळाल्याने चोरट्यांनी कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. त्याचप्रमाणे कोरगावकर कॉलनी व सावंत कॉलनी येथेही चोरट्यांनी प्रयत्न केला; पण हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. रात्रीत चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शिरोली एमआयडीसी पोलिसांनी उपनगरात गस्त सुरू करावी अशी मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01923 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..