चोरीचे कास्टिंग विक्रीसाठी घेऊन जात असताना पाच जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीचे कास्टिंग विक्रीसाठी घेऊन जात असताना पाच जणांना अटक
चोरीचे कास्टिंग विक्रीसाठी घेऊन जात असताना पाच जणांना अटक

चोरीचे कास्टिंग विक्रीसाठी घेऊन जात असताना पाच जणांना अटक

sakal_logo
By

02162

कास्टिंग चोरणारी टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा; ४५ हजारांचा मुद्देमाल, वाहन जप्त
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २९ : चोरीचे कास्टिंग विक्रीसाठी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली. शंभू गजानन कारंडे (वय २१, पाटील कॉलनी, दूध डेअरी जवळ, शिये, ता. करवीर), अभिजित चांगदेव सोनावले (२१, बिरदेव मंदिर जवळ, संभापूर, ता. हातकणंगले), ऋतुराज पंडित समुद्रे (२१, समता परिसर, पुलाची शिरोली), अमोल नामदेव कांबळे (३२, विक्रम नगर, कोल्हापूर) व प्रशांत राजेंद्र धनवडे (२१, समता परिसर, पुलाची शिरोली) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४५ हजारांचे कास्टिंग व वाहन असा मुद्देमाल जप्त केला. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील व्हर्साटाईल कंपनीतून दोन दिवसांपूर्वी हा माल चोरीस गेला होता.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना चोरीचे कास्टिंग विक्रीसाठी पांढऱ्या रंगाच्या वाहनातून शिये- कसबा बावडा मार्गावर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने सापळा लावला. यामध्ये पांढऱ्या रंगाचे वाहन (एमएच १० सीआर ९५१२) पोलिसांना आढळून आले. चौकशी केली असता यामध्ये चोरीचे कास्टिंग असल्याचे निष्पन्न झाले. हे कास्टिंग शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून चोरी केल्याचेही उघड झाले. याबाबत २६ जुलैला शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. यामध्ये सुमारे सोळाशे किलो वजनाचे १३ कास्टिंग मटेरियलच्या मॅच प्लेट व कोर बॉक्स असे ४४ हजार आठशे रुपये किमतीचे कास्टिंग व वाहन जप्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01950 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..