सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान वाहतुकीची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान वाहतुकीची कोंडी
सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान वाहतुकीची कोंडी

सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यान वाहतुकीची कोंडी

sakal_logo
By

शिरोली : येथील सांगली फाटा येथे सायंकाळी सहाच्या सुमारास झालेली वाहतूक कोंडी, कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहनेही उड्डाणपुलावर थांबून होती.


सांगली फाट्यावरील
सेवा रस्त्यावर पाणी
वाहतूक विस्कळीत; बावडा रस्ता बंदमुळेही ताण

सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. ११ : संततधार पाऊस आणि धरणातून सुरू असणारा विसर्गामुळे पंचगंगा नदीतील पातळीत वाढ होत आहे. पुणे - बंगळूर महामार्गाला समांतर सेवा मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, आज दिवसभर पुलाची शिरोली येथील सांगली फाटा ते तावडे हॉटेलदरम्यान वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शिये - कसबा बावडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. परिणामी, या मार्गावरील वाहतूकही राष्ट्रीय महामार्गावर वळविली. याचा ताण आज दिवसभर पोलिस प्रशासनावर होता.
सांगली फाटा येथे सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने वळण घेण्यासाठी असणाऱ्या सेवा मार्गावर मोठा खड्डा असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी कायमचीच आहे. खड्डे मुजवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पुरेसा निधी नाही की, वेळ नाही, असा प्रश्‍न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सेवा मार्गावर पुराचे पाणी आल्याने गर्दीच्या वेळी वापरात येणारा हा सेवा मार्ग आज बंद झाला. शिवाय तावडे हॉटेल येथे पुलाखाली कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांनी कोंडी केली होती. त्यामुळे महामार्गावर आज दुपारनंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01970 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..