वीस जणांवर तालूका हद्दपारीची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीस जणांवर तालूका हद्दपारीची कारवाई
वीस जणांवर तालूका हद्दपारीची कारवाई

वीस जणांवर तालूका हद्दपारीची कारवाई

sakal_logo
By

हातकणंगले तालुक्यातून
२० जणांना केले हद्दपार
गणेश उत्सव काळात शांततेसाठी कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. १ : शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वीस जणांवर तालुका हद्दपारीची कारवाई केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे ३१ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. सुनावणी होऊन कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी वीस जणांवर हद्दपारीच्या कारवाईचे आदेश दिले. सर्वांवर गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ३१ ऑॅगस्ट ते ९ सप्टेंबर हातकणंगले तालुक्यासाठी बंदी आदेश दिले आहेत.
रोहित संकपाळ, दत्तात्रय कुंभार, रंगराव उन्हाळे, निखिल गायकवाड, अक्षय उर्फ अंकुर मस्के, कैलास आगलावे, विनायक उर्फ विकास चव्हाण, आकाश मोरे, सचिन गावडे, समीर शेख, किरण मस्के, प्रतीक आबदार, सागर वाकडे, परशुराम साखरे, रणजीत आपटे व संतोष बुरुड (शिवाजी नगर व यादववाडी, पुलाची शिरोली) आणि विनायक शेडगे, विवेक चौगुले, स्वप्निल पाटील व संग्राम भोसले (मौजे वडगाव, ता. हातकणंगले) अशी हद्दपार झालेल्यांची नावे आहेत.
उत्सव काळात पोलिसांनी सूचना व समज देऊनही वर्तणुकीत बदल न केल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते, तसेच कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या व्यक्तींमुळे पोलिस प्रशासनास वेठीस धरले जाऊ शकते. यामुळे संशयितांवर हद्दपारीची कारवाई आवश्यक असल्याचे मत शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मांडले होते. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01990 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..