मोबाईल चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक
मोबाईल चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक

मोबाईल चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक

sakal_logo
By

२२४६

गांधीनगरातील अट्टल घरफोड्या जाळ्यात
ंसंशयित रेकॉर्डवरील; १३ मोबाईल, मोपेडसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २२ : मोबाईल चोरीप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक केली आहे. किशन ऊर्फ बोबड्या उमाशंकर कुंभारभाटी (रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तेरा मोबाईल व मोपेड असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समीर मुल्ला, सहायक फौजदार अविनाश पवार व नजीर शेख यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शिरोली औद्योगिक वसाहतीमधील टोपच्या हद्दीतील चाळीतून परप्रांतीय मजुरांचे तीन मोबाईल सोमवारी (ता. १९) चोरीस गेले होते. याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासात पोलिसांच्या गोपनीय विभागाला शिरोलीत कोणीतरी मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्याचवेळी किशन ऊर्फ बोबड्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सांगली फाटा येथे मोपेड (एमएच ०९ जीजी ३८२२) वरून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी मोपेडची डिग्गी तपासली असता त्यामध्ये स्मार्ट फोन मोबाईल मिळाले. या मोबाईलची बालभारतीसमोरून चोरी केल्याची माहिती बोबड्याने पोलिसांना दिली. चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचे आणखीन दहा स्मार्ट फोन मिळून आले. याची अंदाजे किंमत ६५ हजार रुपये असून पोलिसांनी त्याची मोपेडही जप्त केली आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Nga22b02000 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..