मृत शेमटी किटकांवरुन सुमारे पंधरा मोटारसायकलस्वार घसरून पडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत शेमटी किटकांवरुन सुमारे पंधरा मोटारसायकलस्वार घसरून पडले
मृत शेमटी किटकांवरुन सुमारे पंधरा मोटारसायकलस्वार घसरून पडले

मृत शेमटी किटकांवरुन सुमारे पंधरा मोटारसायकलस्वार घसरून पडले

sakal_logo
By

मृत शेमटी किटकांवरून घसरून
१५ मोटारसायकलस्वार जखमी


सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. २३ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर शेमटी मे प्लाय कीटकांचे थवेच्या थवे वाहनधारकांसमोर येत असल्याने शनिवारी पंचगंगा पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलावरचा रस्ताही निसरडा बनला होता. मृत शेमटी किटकांवरून घसरल्याने सुमारे पंधरा मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाले. यातील एक मोटारसायकलस्वार घसरून थेट मोटारीखाली गेला. मोटारीनेही त्याला सुमारे दहा फूट फरफटत नेले. केवळ दैव बलवत्तर म्हणून संबंधित मोटारसायकलस्वार या दुर्घटनेत सुरक्षित राहिला. ही घटना शनिवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर घडली. घसरून पडणारे सर्व मोटारसायकलस्वार स्वतःच उठून जात होते. काहींना इतर मोटारसायकलस्वार थांबून सहकार्य करत होते.
पंचगंगा पुलावर शाहूपुरी, गांधीनगर आणि शिरोली एमआयडीसी अशा तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीची सीमा ठरते. शिवाय स्वतः घसरून पडल्यामुळे तक्रार कुणाविरुद्ध द्यायची हा ही एक अनुत्तरीत प्रश्नच होता. त्यामुळे याबाबत पोलिस ठाण्यात काहीच दाखल झाले नाही. पण काळजी म्हणून आज शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या पुलावर बंदोबस्त ठेवला. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील स्वतः उपस्थित होते. शिवाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. महामार्ग पोलिसही उपस्थित होते. मात्र आज शेमटी कीटकांनी सर्वांना हुलकावणी दिली. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त होता, पण शेमटी कीटक मात्र फिरकलेच नाहीत.