मुक्कामापुर्वीच काळाने झडप घातली आणि जठारवाडीकरांसाठी आजची रात्र आक्रोश घेऊन आली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्कामापुर्वीच काळाने झडप घातली आणि जठारवाडीकरांसाठी आजची रात्र आक्रोश घेऊन आली
मुक्कामापुर्वीच काळाने झडप घातली आणि जठारवाडीकरांसाठी आजची रात्र आक्रोश घेऊन आली

मुक्कामापुर्वीच काळाने झडप घातली आणि जठारवाडीकरांसाठी आजची रात्र आक्रोश घेऊन आली

sakal_logo
By

2312 - रंजना जाधव
२३१४ - शांताबाई जाधव
2208 - सुनीता उत्तम पोवार
२२०९ - गौरव उत्तम पोवार
2318 - शारदा घोडके
2317 - सर्जेराव जाधव
2316 - सुनीता काटे

मुक्कामापूर्वीच काळाची झडप
नागाव : दिंडीवर मुक्कामापूर्वीच काळाने झडप घातली आणि जठारवाडीकरांसाठी आजची रात्र आक्रोश घेऊन आली. जुनोनी (ता. सांगोला) येथे भरधाव मोटार घुसल्याने जठारवाडीचे सात वारकरी जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जठारवाडी या एका गावातील चार महिलांचा समावेश आहे. शारदा आनंदा घोडके, सुनीता सुभाष काटे, शांताबाई सुभाष जाधव, रंजना बळवंत जाधव व सर्जेराव श्रीपती जाधव यांच्या मृत्यूने जठारवाडीवर शोककळा पसरली. अनिता गोपीनाथ जगदाळे (वय ६०), अनिता सरदार जाधव (५५), सरिता अरुण शियेकर (४५), शानुताई विलास शियेकर (३५), सुभाष केशव काटे (६७, सर्व रा. जठारवाडी) जखमी आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगोल्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.
दिंडीत सुमारे ३५ वारकरी गुरुवारी (ता. २७) दिंडीने कार्तिक वारीसाठी निघाले होते. यामध्ये जठारवाडीचे तीस जण, वळिवडेचे दोघे, उचगावचे एक व पन्हाळा तालुक्यातील दोघांचा समावेश होता. शुक्रवारी कार्तिक एकादशी आहे. ही दिंडी पंढरपूर येथे गुरुवारी (ता. ३) पोहचणार होती. दिवस लहान असल्याने आणखी दीड किलोमीटरवर सायंकाळी सातच्या सुमारास दिंडी मुक्कामी थांबणार होती; पण मुक्कामापूर्वीच काळाने त्यांना गाठले. अपघाताची माहिती विविध समाज माध्यमांद्वारे गावात पसरली. त्यामुळे नातेवाइकांकडून मृतांची नावे व जखमींची माहिती घेणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जठारवाडीचे सरपंच नंदू खाडे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी गेले. त्याचप्रमाणे मृत आणि जखमींचे नातेवाईकही मोठ्या संख्येने सांगोल्याकडे जात होते. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जठारवाडीत येऊन मृतांच्या व जखमींच्या नातेवाइकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मोटार चालक तुकाराम दामू काशीद (रा. सोनद, ता. सांगोला) व दिग्विजय मानसिंग सरदार (रा. पंढरपूर) अशा दोघा जणांना ताब्यात घेतल्याचे सांगोला पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.

फोटो