संवेदनशीलता संपलेल्या आरोपींना कठोर शिक्षा : चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संवेदनशीलता संपलेल्या आरोपींना कठोर शिक्षा : चंद्रकांत पाटील
संवेदनशीलता संपलेल्या आरोपींना कठोर शिक्षा : चंद्रकांत पाटील

संवेदनशीलता संपलेल्या आरोपींना कठोर शिक्षा : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By

02329
जठारवाडी : येथील मृत्त वारकरी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना मंत्री चंद्रकांत पाटील अमल महाडिक व इतर मान्यवर.

अपघातातील वारकऱ्यांच्या
सरकार ठामपणे उभे
मंत्री चंद्रकांत पाटील यांची जठारवाडीत भेट
शिये, ता. ४ : संवेदनशीलता संपलेल्या संशयित आरोपींना कठोर शिक्षा होईल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. अपघातातील मृत आणि जखमी वारकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे सांगून त्यांनी जठारवाडी येथील मृत व जखमी वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना धीर दिला
जठारवाडी (ता. करवीर) येथील मृत्त व जखमी वारकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, राहुल चिक्कोडे, वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते. पंढरपूरकडे पायी वारीने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. अपघात करुण पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या मोटार चालकास वारकऱ्यांनीच पकडले. त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. शासनाची मदत लवकरच मिळेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सागर पाटील, सरपंच नंदकुमार खाडे, करवीर तालुका भाजपा अध्यक्ष हंबीरराव पाटील, के. एन. पाटील .पोपट खाडे, अक्षय पाटील, मारुती बुवा, उत्तम गाडवे, दत्तात्रय चौगले, संजय कदम आदी उपस्थित होते.