जठारवाडीत १२८ जणांची आरोग्य विभागामार्फत तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जठारवाडीत १२८ जणांची आरोग्य विभागामार्फत तपासणी
जठारवाडीत १२८ जणांची आरोग्य विभागामार्फत तपासणी

जठारवाडीत १२८ जणांची आरोग्य विभागामार्फत तपासणी

sakal_logo
By

जठारवाडीतील १२८ जणांची
आरोग्य विभागामार्फत तपासणी

शिये, ता. ११ : जठारवाडी (ता. करवीर) येथील १२८ जणांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली. यापैकी २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर, आरोग्य सेवक आणि मदतनीस यांचे पथकच जठारवाडीत तळ ठोकून आहे. मात्र, काल तपासणीसाठी देण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आरोग्य विभागाला मिळालेला नाही. गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण ही दूषित पाण्यामुळे झाली असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर आरोग्य विभागाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. पिण्याची पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी गटारीतूनच आहेत. अनेक चावीची कनेक्शन गटारीतच आहेत. डिसेंबर २०२१ नंतर एकदाही टीसीएल पावडरचा वापर झालेला नाही. गावातील सांडपाणी जिथून प्रवाहित होते त्याचठिकाणी गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य कूपनलिका आहे. अशा अनेक कारणांमुळे हा साथीचा आजार आल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
जुनोनी (ता. सांगोला) येथे वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव मोटार घुसल्याने जठारवाडीचे सहा वारकरी ठार झाले. आज त्यांचे उत्तरकार्य असल्याने पुन्हा एकदा गावात मोठा जनसमुदाय जमणार होता. अशात गॅस्ट्रोसदृश आजाराची साथ चिंतेचा विषय होता. मात्र काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी योग्य काळजी घेत टँकर व शुद्ध पाण्याचे कंटेनर संबंधितांच्या कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून दिले होते.