नागावसह परिसरात लम्पीचा प्रभाव वाढता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागावसह परिसरात
लम्पीचा प्रभाव वाढता
नागावसह परिसरात लम्पीचा प्रभाव वाढता

नागावसह परिसरात लम्पीचा प्रभाव वाढता

sakal_logo
By

नागावसह परिसरात
लम्पीचा प्रभाव वाढता
शंभरावर जनावरांना लागण
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २४ : जनावरांमधील लम्पी स्किनचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. परिसरातील नागाव, मौजे वडगाव, टोप, संभापूर, कासारवाडी, शिये, भुये, जठारवाडी या गावांतील सुमारे शंभरावर गाय व बैल यांना लम्पीची लागण झाली आहे. यामध्ये नागाव, टोप, कासारवाडी व शिये येथील सहा गाई दगावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
लम्पीस्कीन हा संसर्गजन्य आजार असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आहे. यामध्ये दूध उत्पादनात घट होते. या आजाराची भीती बाळगण्याची गरज नाही. योग्य उपचार केल्यास यावर मात करता येते. जनावरांच्या गोठ्यातील दक्षता व उपचार पद्धती महत्त्वाची आहे. असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी जनावरांना लम्पीस्किन हा आजार पसरून अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. परिस्थितीवर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ व शासकीय दवाखान्यातर्फे लसीकरणाद्वारे हा आजार आटोक्यात आला होता; पण आठ दिवसांपासून या आजाराने पुन्हा शिरकाव केला आहे. सध्या हातकणंगले, शिरोळ व करवीर तालुक्यातील काही गावात या आजारामुळे संकरीत व साध्या गाई आजारी पडत आहेत. या जनावरांवर उपचारासाठी गोकुळ दूध संघाचा पशुसंवर्धन विभाग, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत.
--------------
कोट
लम्पीचा प्रसार संसर्गजन्य आहे. त्यामुळे जनावरांचे विलगीकरण करून दिलेल्या माहिती व सूचनांची शेतकऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
- ए. व्ही. यादव-बोंगार्डे, पशुवैद्यकीय अधिकारी, टोप