पत्नीचा खून केल्याप्रकरणी कोरवीला पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीचा खून केल्याप्रकरणी कोरवीला पोलिस कोठडी
पत्नीचा खून केल्याप्रकरणी कोरवीला पोलिस कोठडी

पत्नीचा खून केल्याप्रकरणी कोरवीला पोलिस कोठडी

sakal_logo
By

खूनप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी
नागाव : पत्नीचा खून केल्या प्रकरणी चंद्रकांत कोरवी याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पेठवडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून आज कोरवी याला हजर केले. मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे चारित्र्याच्या संशयावरून चंद्रकांत कोरवी याने काल पत्नीचा निर्घृण खून केला. खून करून कोरवी स्वतःहून हातकणंगले पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सखोल चौकशी आणि सबळ पुराव्याच्या तपासासाठी पोलिसांनी कोरवीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.