मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तिघे तरुण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तिघे तरुण गंभीर
मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तिघे तरुण गंभीर

मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तिघे तरुण गंभीर

sakal_logo
By

मोटारसायकलींची समोरासमोर
धडक, तिघे तरुण गंभीर
नागाव, ता. ९ : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे तरुण गंभीर जखमी झाले. अतुल अंकुश गुडाळे (वय ३२, रा. नागाव), स्वप्नील ऊर्फ संभाजी कांबळे व अविनाश कांबळे अशी जखमींची नावे आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा मार्गावर नागाव येथील राजेश मार्बलसमोर रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घडला.
घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अतुल कुडाळे हा मोटारसायकलवरून नागाव फाट्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी अविनाश कांबळे व स्वप्नील कांबळे हे दोघे मोटारसायकलवरून नागाव येथील डॉ. आंबेडकर नगरमधून शिरोली एमआयडीसीकडे निघाले होते. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा मार्गावरील राजेश मार्बल येथे या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. दोघांच्याही मोटारसायकली भरधाव वेगाने असल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. अतुल गुडाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर अविनाश व स्वप्नील हेही गंभीर जखमी आहेत. तिघाही जखमींवर कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.