आयटीआयला देशात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी कमिन्स सर्व प्रकारची मदत करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीआयला देशात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी कमिन्स सर्व प्रकारची मदत करणार
आयटीआयला देशात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी कमिन्स सर्व प्रकारची मदत करणार

आयटीआयला देशात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी कमिन्स सर्व प्रकारची मदत करणार

sakal_logo
By

02396
शिरोली : स्मॅक आयटीआय भवनचे उद्घाटन अश्वथ राम यांच्या हस्ते झाले. शेजारी दीपक पाटील, शुभंकर चटर्जी, अजय पाटील, जतिन भाटिया, विपीन कौल, राजू पाटील आदी.

स्मॅक आयटीआय देशात सर्वोत्कृष्ट बनवा
अश्वथ राम; ‘स्मॅक आयटीआय भवन’चे उद्घाटन
सकाळवृत्तसेवा
नागाव, ता. १९ : स्मॅक आयटीआयला देशात सर्वोत्कृष्ट बनवा. यासाठी कमिन्स इंडियाकडून आवश्यक सर्व सहकार्य राहिल असा विश्वास कमिन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्वथ राम यांनी व्यक्त केला. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक) संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमल गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या नूतन वास्तू ‘स्मॅक आयटीआय भवन’ या इमारतीचे उद्घाटन राम यांच्या हस्ते झाले. स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. कमिन्सचे मुख्य पुरवठा अधिकारी शुभंकर चटर्जी, मुख्य वित्त अधिकारी अजय पाटील, सीबीएस इंडिया लिडर जतिन भाटिया, पर्चेशिंग लिडर विपीन कौल, स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील प्रमुख उपस्थित होते.
राम म्हणाले, ‘स्मॅक आयटीआय ही महाराष्ट्रातील अव्वल प्रशिक्षण संस्था आहे.’
स्मॅक आणि कमिन्स इंडिया यांच्या सामंजस्य करारामुळे आयटीआयमध्ये आमूलाग्र बदल करता आला असल्याचे स्मॅक अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
कमिन्समुळे आयटीआयमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मशिनरी घेता आली. याचा प्रशिक्षणार्थींना चांगला फायदा होत आहे. यामुळे स्मॅक आयटीआय राज्यात सर्वोत्कृष्ट आयटीआय बनेल असे स्मॅक आयटीआय अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
कमिन्स इंडिया लिमिटेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयटीआयच्या सर्व विभागांना भेटी देऊन माहिती घेतली.
स्मॅकचे उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, ज्येष्ठ संचालक सुरेन्द्र जैन, निरज झंवर, भरत जाधव, प्रशांत शेळके, जयदीप चौगले, उद्योजक दिपक जाधव, नामदेव पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य डी. बी. पाठक यांनी आभार मानले.