धारदार शस्त्राने वार करत पुलाची शिरोलीत दोघांना जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारदार शस्त्राने वार करत पुलाची शिरोलीत दोघांना जखमी
धारदार शस्त्राने वार करत पुलाची शिरोलीत दोघांना जखमी

धारदार शस्त्राने वार करत पुलाची शिरोलीत दोघांना जखमी

sakal_logo
By

पुलाची शिरोली येथे दोघांना मारहाण

नागाव, ता. ११ : ‘आमच्या दारात थांबू नका’ म्हटल्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने वार करत दोघांना जखमी करण्यात आले. विजय बाबासो थोरवत व संजय परशराम थोरवत अशी जखमींची नावे आहेत. पुलाची शिरोली येथील थोरवत कॉलनीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुलाची शिरोली येथील थोरवत कॉलनीत विजय थोरवत व संजय थोरवत यांच्या दारात शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम गव्हाणे, दिपक सिकंदर जानराव आणि अन्य अनोळखी दोन युवक आपापसात अश्लील शिवीगाळ करत भांडत होते. यावेळी विजय थोरवत यांनी आपल्या दारात थांबू नका, असे सांगितले. या कारणावरून मनात राग धरून शुभम गव्हाणे, दिपक जानराव आणि अन्य दोघेजण विजय थोरवत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करू लागले. एकाने धारदार शस्त्राने विजय यांच्या पाठीवर, डाव्या खांद्यावर वार करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संजय थोरवत यांच्या मानेवरही धारदार शस्त्राने वार केले. जखमींना तत्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करत आहेत.