संभापूरात दोन गटात मारामारी, चौघे जखमी, तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभापूरात दोन गटात मारामारी, चौघे जखमी, तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल
संभापूरात दोन गटात मारामारी, चौघे जखमी, तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संभापूरात दोन गटात मारामारी, चौघे जखमी, तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By

रंगपंचमीच्या स्टेटसवरून
संभापुरात दोन गटांत हाणामारी

चौघेजण जखमीः परस्परविरोधी तक्रारी दाखल, तीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. १४ : रंगपंचमीचा स्टेटस आणि पायावर मोटारसायकल घातली म्हणून संभापुरात दोन गटांत हाणामारी झाली. लाथाबुक्क्या, काठी, खोरे व बेल्टचा वापर हाणामारीत झाल्याने यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने सुमारे तीस जणांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत विलास माळी (वय २१), विलास वसंत माळी, सुशांत विलास माळी व श्रेयस प्रकाश झिरंगे (वय १७) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास संभापूर येथील बजरंग दूध डेअरीजवळ घडली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अनिकेत माळी व प्रकाश झिरंगे हे दोघेही एकाच गावातील आहेत. सोमवारी रंगपंचमी दिवशी बजरंग डेअरीजवळ अनिकेत माळी याने श्रेयश झिरंगे याच्या पायावर मोटारसायकल घातली. श्रेयशने याचा जाब विचारल्यावर माळी याने झिरंगे याला थोबाडीत मारत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर सुमारे पंधरा जणांच्या जमावाने झिरंगे याला मारहाण करत जखमी केले. तर रंगपंचमीच्या नाचगाण्याचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झिरंगे याने सुमारे पंधरा जणांच्या जमावासह अनिकेत माळी, विलास माळी व सुशांत माळी यांना मारहाण केली.
श्रेयस प्रकाश झिरंगे याच्या तक्रारीवरून संदीप महाडिक, अनिकेत माळी, पांडुरंग जाधव, सुशांत माळी, सम्राट महाडिक, सुमित पवार, शुभम जाधव, शिवराज जाधव, पृथ्वीराज जाधव, बाबासो आकाराम जाधव, रघुनाथ गणपती जाधव, अभिषेक बाजीराव मोहिते, अरविंद शंकर जाधव, आनंदराव जाधव व प्रवीण आनंदराव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अनिकेत विलास माळी याच्या तक्रारीवरून श्रेयश ऊर्फ कृष्णा जयदीप झिरंगे, सूरज झिरंगे, सूरज भोसले, प्रताप भोसले, तुषार भोसले, धैर्यशील भोसले, तानाजी भाऊसो भोसले, राजू मिरजे, ओमकार राजू मिरजे, देवदूत झिरंगे, सुरेश विजय भोसले, रावसाहेब कारंडे, रोहित झिरंगे व रवी जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.