उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर
उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर

उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर

sakal_logo
By

फोटो
...

उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले

उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. १४ : कोल्हापूर उद्यम को- आॅप. सोसायटीच्या अध्यक्षपदी दिनेश बुधले व उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर यांची निवड करण्यात आली. उपनिबंधक कार्यालय अधिकारी पी. एम. मालगावे हे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी कोल्हापूर उद्यम को-ऑप. सोसायटी ही महाराष्ट्रातील एक नामांकित औद्योगिक संघटना आहे. फाउंड्री उद्योगाला लागणारे पीग आयर्न, कोक, लघु उद्योगांसाठी वजनकाटा सुविधा आणि लघु उद्योजक सभासदांना जागा पुरविणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. येथून पुढेही लघु उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्था कार्यरत राहील, असे सांगितले.
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत चोरगे, हिंदूराव कामते, संजय अंगडी, अशोक जाधव, भरत जाधव, माणिक सातवेकर, सुधाकर सुतार, राजन सातपुते, संगीता नलवडे यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.