
महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रीत करावे ; प्रा. डॉ. विजय ककडे
02563
महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यावर
लक्ष केंद्रित करावे
प्रा. डॉ. विजय ककडे; आर्थिक साक्षरतेवर व्याख्यान
नागाव, ता. १७ : महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन सेबीचे राष्ट्रीय संसाधन सदस्य प्रा. डॉ. विजय ककडे यांनी केले. काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि इंडियन वूमन नेटवर्क (आयडब्ल्यूएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक साक्षरता या विषयावर व्याख्यानावेळी ते बोलत होते.
डॉ. ककडे म्हणाले, ‘आर्थिकबाबतीत पती, मुलगा किंवा वडिलांवर अवलंबून राहण्याचा पूर्वीचा जमाना गेला. महिलांनी आर्थिक साक्षर झाले नाही तर भविष्यात कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागेल आणि अशा अनेक घटनाही घडलेल्या आहेत. स्वत:च्या पैशाच्या बाबतीत जागरुगता हवी. महिलांची सर्वाधिक फसवणुक त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून होते. याची दखल घेऊन योग्य काळजी घेतली पाहिजे. महिलांनी आर्थिक स्वातंत्र्याची चिंता केली पाहिजे. आपल्या पतीच्या आर्थिक व्यवहारासोबतच वैयक्तिक आर्थिक व्यवहारांवर महिलांनी लक्ष केंद्रीत करायला हवे.’
यावेळी महिलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. ककडे यांनी उत्तरे दिली. महिलांनी पेपर गोल्ड, स्टॉक मार्केट, शेअर बाजार, पैसे गुंतवण्याचे ॲप्स, पैसे गुंतवण्यासंदर्भातील समज आणि गैरसमज याविषयीही प्रश्न डॉ. ककडे यांना प्रश्न विचारले. ‘आयडब्लूएन’च्या निमंत्रक गौरी शिरगांवकर यांनी प्रास्तविक केले. सोनाली पटेल यांनी आभार मानले.