शेतकरी केंद्रबिंदू मानून राजाराम कारखान्याचा कारभार सुरू - अमल महाडिक

शेतकरी केंद्रबिंदू मानून राजाराम कारखान्याचा कारभार सुरू - अमल महाडिक

02565

शेतकरी केंद्रबिंदू मानून
‘राजाराम’चा कारभार
अमल महाडिक; विविध ठिकाणी सभासदांशी संवाद
नागाव, ता. १८ : शेतकरी केंद्रबिंदू मानून राजाराम कारखान्याचा कारभार सुरू असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रातील चोकाक, हुपरी, इंगळी, वंदूर, करनूर, लिंगनूरमधील सभासदांची माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट घेतली. यावेळी सभासद शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
महाडिक म्हणाले, ‘ऊस उत्पादकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कारखाना प्रशासनाने नेहमीच पुढाकार घेतला. ऊस बियाणे, रोपवाटप तसेच माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून सल्ला आणि मार्गदर्शन करत उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले. महापूरकाळात पूरबाधित क्षेत्रातील ऊसाला प्राधान्य देऊन उचल केली. प्रत्येक संकटावेळी सभासदांसोबत राहिल्यानेच आज सत्तारूढ सहकार आघाडीबाबत सकारात्मकता आहे. हीच सकारात्मकता विजयापर्यंत घेऊन जाईल.’ केवळ सूडबुद्धीने अपप्रचार करायचा आणि स्वार्थ साधायचा हीच विरोधकांची निती आहे. ‘राजाराम’च्या कारभारावर बोलण्यासारखे काहीही नसल्यामुळे विरोधक बेताल वक्तव्य करत असल्याचे सांगितले. यावेळी सभासदांनी राजाराम कारखान्याच्या पारदर्शी कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी यावेळी संचालक आनंदा तोडकर, वडगाव बाजार समिती सदस्य धुळाप्पा डवरे, शिवसिंह घाडगे, महावीर पाटील, देवाप्पा मुधाळे, संजय मगदूम, अविनाश बनगे, कृष्णा निकम, नंदकुमार पाटील, दिनकर ससे, सुभाष माळी, संभाजी निकम, शांताराम देसाई, अनंत बल्लोळे, किरण पोतदार, संभाजी पाटील, श्रीमंधर चौगुले, रावसाहेब पाटील, जिनेंद्र ऐतवडे, शांतीनाथ देसाई, रामू पाटील, तानाजी बागणे, कोंडीबा लोकरेंसह सभासद शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com