
हुकूमशाही बघायची असल्यास डी वाय साखर मध्ये बघा - अमल महाडिक
02571
हुकूमशाही बाहेर नव्हे;
स्वत:च्या संस्थांत शोधा
अमल महाडिक; टोपमध्ये सभासद मेळावा
नागाव, ता. २० : विरोधकांनी हुकूमशाही बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या संस्थांत डोकावून बघावे, असा उपरोधिक सल्ला माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता दिला. राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ टोपमध्ये आयोजित सभासद मेळाव्यात ते बोलत होते. अमल महाडिक यांनी आज संभापूर, पट्टणकोडोली, रुई, मिणचेतील सभासद, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.
महाडिक म्हणाले, ‘निवडणुका आल्या की, राजाराम कारखान्यात हुकूमशाही आहे म्हणायचं. सभासदांची दिशाभूल करणे हाच एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे. राजाराम कारखान्याचा कारभार उत्तम सुरू आहे. याची सभासदांना खात्री आहे, म्हणूनच अनेक वर्षांपासून त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली.’
यावेळी माजी अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सर्जेराव माने यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘ज्यांच्या जीवावर तुम्ही संचालक झाला, चेअरमन झाला त्यांनाच विसरला. स्वार्थ साधण्यासाठीच तुम्ही विरोधकांसोबत गेला. पण स्वाभिमानी सभासद गद्दारीचं फळ निश्चित देतील.’
यावेळी सरपंच तानाजी पाटील, धनाजी पाटील, विजयसिंह घोरपडे, दामोदर पाटील, माजी सरपंच पिलाजी पाटील, माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील, बाजार समिती सदस्य शिवाजी पाटील, वीरधवल पाटील, डॉ. संजय मिरजकर, विजयसिंह पाटील, माणिक पाटील, विष्णुपंत गायकवाड, डॉ. कल्लेश्वर मुळीक, लक्ष्मण पाटील, आनंदा भोसले, बापू पोवार, शिवाजी चौगले, बाबासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, अमित पाटील, रमेश पाटीलसह ग्रामपंचायत सदस्य आणि सभासद शेतकरी उपस्थित होते.