वनविभागाच्या पाहणीत बिबट्या असल्याचा दुजोरा नाही

वनविभागाच्या पाहणीत बिबट्या असल्याचा दुजोरा नाही

शियेतील बिबट्याबाबत दुजोरा नाही
शिये : वनविभागाच्या पाहणीत बिबट्या असल्याचा दुजोरा मिळाला नाही. मात्र संबंधित विभागाने परिसरातील नागरिकांना विशेष काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शिये (ता. करवीर) येथील शिये - भुये मार्गावरील आडवा ओढा परिसरात काल बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले. या पार्श्वभूमीवर वनविभाग, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे, रेस्क्यू पथक आणि पोलिस पाटील यांच्या विशेष पथकाने आज परिसरात पहाणी केली.
पुलाची शिरोली येथील संदिप आसुर्लेकर - पाटील व त्यांच्या चुलत्यांना काल रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी रस्ता ओलांडून जाताना दिसला. आसुर्लेकर - पाटील यांच्या म्हणण्यानुसार तो पुर्ण तयार झालेला बिबट्याच आहे. त्यामुळे वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे, वनरक्षक कृष्णात दळवी, के. बी. पादरे, वनपाल विजय पाटील, रेस्क्यूचे प्रदीप सुतार, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील,भुयेचे पोलिसपाटील धनाजी शिंदे यांनी आज शिये - भुये परिसरात पहाणी केली. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com