क्षमतेपेक्षा जास्त जोखीम असल्याने एक्सपोर्टची मर्यादा

क्षमतेपेक्षा जास्त जोखीम असल्याने एक्सपोर्टची मर्यादा

उद्योगासमोरील आव्हाने ःभाग ५
...

क्षमतेपेक्षा जास्त जोखीम असल्याने एक्सपोर्टची मर्यादा

केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे उद्योजकांपर्यंत पोहचणे आवश्यक

अभिजित कुलकर्णी , सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. १२ : क्षमतेपेक्षा जास्त जोखीम असल्याने कोल्हापूरच्या उत्पादनाला एक्सपोर्टची मर्यादा आली आहे. आपले उत्पादन आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या मानांकनास पात्र असेल, तर उद्योगाला एक्सपोर्टच्या जोखीमीची काळजी करण्याची गरज नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवाय जोखीम कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. पण त्या प्रभावीपणे उद्योजकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
वाहन निर्मिती क्षेत्रातील मोठ्या उद्योगाचा प्रकल्प कोल्हापुरात येणे कठीण आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या उद्योजकांनी स्वतःच्या विस्तारासाठी एक्सपोर्टचे धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. उत्पादनाला योग्य भाव आणि नफा मिळवायचा असेल तर एक्सपोर्ट वाढणे आवश्यक आहे. आणि उद्योग विस्ताराची ही एक प्रमुख गरज आहे.
एक्सपोर्ट करण्यासाठी संबंधित देशाची भाषा, खरेदीदार कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड, गुणवत्तेचे मानांकन, ट्रान्सपोर्टेशन, क्वालिटी इश्यूमुळे होणारे रिजेक्शन, पाठवलेला माल थांबवून ठेवल्यास तो ठेवायचा कुठे यासाठी निर्माण होणारी समस्या आणि अर्थकारणाशी संबंधित अनेक समस्या यांचा विचार करता वीस ते पंचवीस टक्क्याच्यावर एक्सपोर्ट करावा, अशी येथील उद्योजकांचीच मानसिकता नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या उद्योगाला प्रदीर्घ अनुभव असूनही एक्सपोर्टच्या बाबतीत मागासलेपण आहे.
सध्याचा एक्सपोर्ट हा पुणे, मुंबई येथील मध्यस्थीमार्फत सुरू आहे. एक्सपोर्ट संदर्भातील तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन येथील उद्योजकांना थेट मिळाले तर त्यांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
उद्योजक एकदा एक्सपोर्टच्या भूमिकेत गेला की, कामातील अनिश्चितता, इतर मोठ्या उद्योजकांकडून होणारी पिळवणूक आणि आर्थिक समस्येशी निगडित प्रश्न यांची आपसूकच सोडवणूक होईल. शिवाय देशांतर्गत बाजारपेठेत खरेदीदार आणि पुरवठादार यांच्यामध्ये असणारी दरी ही काही प्रमाणात का होईना कमी होईल. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) च्या माध्यमातून उद्योजकांना निर्यातीभिमुख उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे, ही एक जमेची बाजू आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्मॅक’च्या स्किल ट्रेड प्रमोशन समितीमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रथमच अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासामार्फत प्रमुख जनसंपर्क अधिकारी रॉब अँडरसन यांनी जिल्हयातील औद्योगिक वसाहतींना भेट दिली.
..............
समाप्त
....................

''एक्सपोर्ट करणाऱ्या उद्योगांना अनेक अडचणी आहेत. पण सकारात्मक दृष्टीने त्यावर मात करून आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचाच आहे हे उद्दिष्ट ठेवून काम करायला हवे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी पन्नास टक्के आणि एक्सपोर्टसाठी पन्नास टक्के असे प्रमाण आर्थिक स्थिरतेसाठी योग्य राहील.
अमर जाधव, अध्यक्ष, स्किल ट्रेड प्रमोशन समिती, स्मॅक
...

‘ एक्सपोर्ट वाढवणे ही गरज आहे. पण त्यासाठी आवश्यक भौतिक सुविधांचा अभाव आणि खरेदीदार व पुरवठादार यांच्यामधील होणारा संवाद हा अधिक सुलभ आणि सोयीचा व्हायला हवा. अन्यथा गुणवत्तेच्या मानांकनावर नाकारले जाणारे काम उद्योगाला न परवडणारे आहे.

संजय भगत, उद्योजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com