शियेत भटक्या कुत्र्यांच्या हल्यात शेळीची दोन पिल्ले ठार

शियेत भटक्या कुत्र्यांच्या हल्यात शेळीची दोन पिल्ले ठार

शिये येथे भटक्या कुत्र्यांच्या
हल्ल्यात दोन कोकरे ठार

शिये, ता. २१ : शिये (ता. करवीर) येथील माळवाडी भागातील बाळूमामा मंदिरासमोर कृष्णात पांडुरंग रानगे यांच्या शेळीच्या दोन कोकरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना ठार केले.
आज सकाळी सातच्या सुमारास कुत्र्यांचा आवाज ऐकून भगवान वाघमोडे व संकेत रानगे घटनास्थळी गेले. त्यावेळी शेळीच्या एका कोकरास तोंडात घेऊन कुत्री जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कुत्र्यांना हटकल्यानंतर जखमी कोकरास तेथेच टाकून कुत्री पळून गेली. रानगे यांनी ज्या ठिकाणी शेळ्या ठेवल्या आहेत, त्या ठिकाणी आणखी एका कोकराच्या पोटावर हल्ला करुन ठार केल्याचे आढळून आले. घटनास्थळी वन विभागाचे कृष्णात दळवी, के. बादरे, रेस्क्यूचे प्रदीप सुतार यांनी पाहणी केली.
दरम्यान, पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले शिये ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. शेतात असणारे जनावरांचे गोठे आणि गोठ्यात बांधलेली वासरे हिंस्त्र प्राण्यांकडून शिकार होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com